मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री लीझा हेडन सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. अलिकडेच लीझाने एक फोटो शेअर करुन चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.
लीझाने या फोटोद्वारे ती दुसऱ्यांदा आई बनणार असल्याचे सांगितले आहे. 'बेबी बंप'सोबत असलेल्या तिच्या या फोटोवर चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
लीझा २०१६ साली ऑक्टोबरमध्ये डिनो लालवानीसोबत विवाहबंधनात अडकली होती. २०१७ मध्ये मे महिन्यात तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. जॅक असे तिच्या पहिल्या मुलाचे नाव आहे.
लीझा नेहमी तिच्या पती आणि मुलासोबतचे अनेक फोटो पोस्ट करत असते. आता ती तिच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची वाट पाहत आहे.
लीझाने कंगना रनौतसोबत 'क्विन', 'हाऊसफुल ३', 'ऐ दिल है मुश्किल', यांसारख्या चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. तिच्या फिटनेसमुळे आणि बोल्डनेसमुळे ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते