मुंबई - अभिनेत्री काजल अग्रवालने गेल्या वर्षी 30 ऑक्टोबरला उद्योजक गौतम किचलूसोबत मुंबईत लग्नगाठ बांधली होती. आता त्यांच्या संसारात तिसऱ्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सध्या काजल अग्रवाल सध्या आई होणार असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.
काजल अग्रवालचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये तिचं बेबी बंप दिसत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, काजल आणि तिचा पती गौतम यांनी अद्याप गरोदरपणाबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. मीडियाने प्रश्न विचारला असता काजोलने यादरम्यान तिने गरोदरपणाची बातमी नाकारली किंवा स्वीकारली नाही.