अहमदनगर -लोकसभा निवडणूकीदरम्यान पाठिंबा मागण्यासाठी आलेल्या दीपाली सय्यद यांच्यावर खासदार सुजय विखे यांनी साकळाई योजनेच्या अनुषंगाने टीका केली होती. याबाबत त्यांनी माफी मागावी अन्यथा महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा साकळाई पाणी योजना कृती समितीच्या अध्यक्षा तसेच अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिला आहे.
सुजय विखे माफी मागा अन्यथा.. अभिनेत्री दीपाली सय्यदचा इशारा - sujay vikhe controversy
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे ४ दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना खा़. विखे यांनी दीपाली सय्यद यांच्यावर टीका केली होती.
सुजय विखे माफी मागा अन्यथा महिला आयोगा कडे तक्रार करेल, अभिनेत्री दीपाली सय्यदचा इशारा
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे ४ दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात साकळाई पाणी योजनेबाबत बोलताना खा़. विखे म्हणाले होते, की 'तुमच्याकडे देखणा माणूस आला तर त्याला फक्त पहायला जा. साकळाई योजना फक्त सुजय विखेच करू शकतो. अन्य कोणाचे ते काम नाही', अशा शब्दांत त्यांनी टीका केली होती.
विखेंच्या या वक्तव्याबाबत दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत विखेंबाबत संताप व्यक्त केला आहे.