मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिक पदुकोणने मुंबईतल्या सेंट अनेज हायस्कूलमधील मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. शूटिंग आणि जाहिराती यामधून वेळ काढून तिने मतदान केलं.
आज बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळीही दीपिकाने मतदान केलं होतं.
काही कलाकारांनी जरी मतदानाकडे पाठ फिरवली असली, तरीही मतदान आपलं कर्तव्य मानून कलाविश्वातून बऱ्याच कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला.
गीतकार जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनीदेखील मतदान केलं आहे.
अभिनेता हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांनीही केलं मतदान
हेही वाचा -शूटिंग आणि नाटक बाजूला ठेवत मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
मतदान केंद्र -
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.
हेही वाचा -बॉलिवूड सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क