महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘पावनखिंड’चे कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्दर्शकांनी केले चित्रपट पाहण्याचे आवाहन - Appeal to see Pavankhind

बाजीप्रभू देशपांडेंची शौर्यगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारतोय अजय पूरकर. त्या भूमिकेसाठीची त्याची निवड त्याने सार्थ ठरविली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अष्टपैलू कलाकार चिन्मय मांडलेकर आहे. या चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि दिग्दर्शकांनी चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

पावनखिंड
पावनखिंड

By

Published : Feb 19, 2022, 1:36 PM IST

Updated : Feb 19, 2022, 6:34 PM IST

शिवराज अष्टक या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांनंतर लेखक-दिग्दर्शक-अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी स्वराज्याच्या वाटेवरील तिसरं सुवर्णपान 'पावनखिंड' चित्रपटाच्या निमित्ताने उलगडलं आहे. संगीतकार देवदत्त बाजी यांनी संगीताची बाजू सांभाळली आहे आणि त्यांच्यासोबत निखिल लांजेकर यांनी उत्कृष्ट साउंड डिझाईनिंग करून चित्रपटाची उंची वाढविली आहे.

बाजीप्रभू देशपांडेंची शौर्यगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारतोय अजय पूरकर. त्या भूमिकेसाठीची त्याची निवड त्याने सार्थ ठरविली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अष्टपैलू कलाकार चिन्मय मांडलेकर आहे. अभिनेता अक्षय वाघमारे याने कोयाजीराव बांदल यांची भूमिका वठवली आहे जे शिवरायांचे चिलखत म्हणून ओळखले जायचे.

सुस्वरूप आणि गुणी अभिनेत्री प्राजक्ता माळी श्रीमंत भवानीबाई बांदल च्या भूमिकेत असून या सर्वांनी मराठी प्रेक्षकांना ‘पावनखिंड’ पाहण्याची नम्र विनंती केली आहे जेणेकरून प्रेक्षकांना, खास करून तरुण प्रेक्षकांना, मराठा इतिहासातील महत्वाच्या घडामोडीबद्दल दृक्श्राव्य माहिती मिळेल.

हेही वाचा -Bal Shivaji: ‘बाल शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन करणार रवी जाधव

Last Updated : Feb 19, 2022, 6:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details