महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

सिनेसृष्टीतील समस्या घेऊन कलाकार कृष्णकुंजवर, नव्या संघटनेच्या निर्मितीची घोषणा - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पदाधिकारी आणि सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी असोसिएशनमध्ये कशा प्रकारे त्रास दिला जातो हे या भेटीत मांडण्यात आले. लवकरच नवीन बिगर राजकीय संघटनेची निर्मिती केली जाईल, त्याबरोबरच या लेबर संघटनेतील सभासद सामूहिक राजीनामा देणार आहेत असे मनसे नेते आम्ही खोपकर यांनी सांगितले.

Actors met Raj Thackeray
सिनेसृष्टीतील समस्या घेऊन कलाकार कृष्णकुंजवर

By

Published : Jul 6, 2021, 4:55 PM IST

मुंबई- सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. एका युनियनच्या पदाधिकारी त्रास देत असल्याचे त्यांनी या व्हिडीओत म्हंटले होते. त्यांच्या आत्महत्येनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनसेने देखील या घटनेची दखल घेत याबाबत संताप व्यक्त केला होता. आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पदाधिकारी आणि सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी असोसिएशनमध्ये कशा प्रकारे त्रास दिला जातो हे या भेटीत मांडण्यात आले. लवकरच नवीन बिगर राजकीय संघटनेची निर्मिती केली जाईल, त्याबरोबरच या लेबर संघटनेतील सभासद सामूहिक राजीनामा देणार आहेत असे मनसे नेते आम्ही खोपकर यांनी सांगितले.

सिनेसृष्टीतील समस्या घेऊन कलाकार कृष्णकुंजवर
कलाकार उपस्थित

राजू सापतेच्या आत्महत्येनंतर आता सिनेसृष्टीमधला वेगळा चेहेरा आता समोर आला आहे. सापते यांना असोसिएशने दिलेल्या त्रासच्या विरोधात आज सिनेसृष्टीचे कलाकार आज राज ठाकरेच्या भेटीला आले होते. यामध्ये महेश मांजरेकर , अतुल परचुरे , पुष्कर श्रोत्री , कांचन अधिकारी या कलाकारांचा समावेश होता.

सिनेसृष्टीतील समस्या घेऊन कलाकार कृष्णकुंजवर
नव्या बिगर राजकीय संघटनेची निर्मिती

एका युनियनच्या पदाधिकाऱ्याने त्रास दिल्याने,खंडणी मागितल्याने मराठी दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली होती. परप्रांतीय युनियनच्या पदाधिकाऱ्यांची ही मुजोरी सहन केली जाणार नाही अशी मनसेची भूमिका आहे. या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मराठी कलाकार राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज दादर इथल्या निवासस्थानी आले होते.

सिनेसृष्टीतील समस्या घेऊन कलाकार कृष्णकुंजवर

यावेळी बोलताना मनसेच्या चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर म्हणाले, ''महाराष्ट्रात माज हा फक्त मराठी माणसांचा चालणार, परप्रांतीयाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. भय्या लोकांची दादागिरी सहन केली जाणार नाही. सर्व कलाकारांच्या पाठीशी मनसे उभी आहे. कुठल्याही सेट वर जाऊन कोणी त्रास दिला तर मनसेकडे संपर्क साधावा.सर्व कलाकारांसाठी एका नव्या संघटनेची स्थापना केली जाणार आहे ही बिगर राजकीय संघटना असणार आहे.''

सिनेसृष्टीतील समस्या घेऊन कलाकार कृष्णकुंजवर

'अलाइड मजदूर युनियनचा पदाधिकारी राकेश मोरयाचे सापडला की हातपाय तोडणार आणि मग पोलिसांकडे देणार. अलाइड मजदूर युनियन बरखास्त केली जाणार त्याच्यातील सर्व सदस्य राजीनामे देतील,'' असेही खोपकर यांनी सांगितले.

हेही वाचा - बिगबॉस फेम राहुल वैद्यचे होणार दोनाचे चार हात; प्रेयसी दिशा परमारशी करणार लग्न

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details