महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

हवाई दलाने सावरकरांना सर्वोत्तम मानवंदना दिली - योगेश सोमण - air strike

अभिनेते योगेश सोमण यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यांनी हवाई दलाचे अभिनंदन करताना ' ये नया हिंदुस्थान है, घर मे घुसेगा भी और मारेगा भी" असे म्हटले आहे.

योगेश सोमण

By

Published : Feb 26, 2019, 7:46 PM IST

पुणे- स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज पुण्यतिथी. आजच पहाटे भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हवाई हल्ला केला. त्यामुळे, स्वातंत्र्यवीरांना आजवर कधीच दिली नसेल अशी मानवंदना त्यांना आपल्या हवाई दलाने दिली, अशी प्रतिक्रिया अभिनेते योगेश सोमण यांनी दिली आहे.


अभिनेते योगेश सोमण यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यांनी हवाई दलाचे अभिनंदन करताना ' ये नया हिंदुस्थान है, घर मे घुसेगा भी और मारेगा भी" असे म्हटले आहे.

पुण्यातील पोलीस दलाने यापासून काहीतरी शिकावं -

आज पहाटेच्या सुमारास हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला करून दहशतवादी तळ आणि जवळजवळ २०० च्या आसपास दहशतवाद्यांना ठार केले असल्याचे सोमण यांनी म्हटले. यासोबतच याची सत्यता, खातरजमा आणि पहिली माहिती पाकिस्तानकडूनच आपल्याला मिळाली असल्याचेही त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले. आमच्या पुण्यातील पोलीस दलाने यापासून काहीतरी शिकावं आणि आपल्याच कर्णबधिर देशबांधवांवर लाठीहल्ला करण्यापेक्षा समाजातील खरे शत्रू ओळखून त्यांना शासन करावं, त्यांचा बंदोबस्त करावा.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details