मराठी आणि हिंदी मध्ये लीलया वावरणारा सिद्धार्थ जाधवचे क्रिकेटवेड सर्वश्रुत आहे. सध्या सर्वत्र आयपीएलचे वारे वाहात आहेत. त्यातच आता मराठी इंडस्ट्रीची क्रिकेट टूर्नामेंटही लवकरच सुरु होणार आहे. त्यातील एका संघाचा कर्णधार सिद्धार्थ असून त्याच्या टीमची ‘नेट प्रॅक्टिस’ सुरु आहे. अशाच एका प्रॅक्टिस सेशनला सिद्धार्थ जाधव जखमी झाला. एक सराव मॅच सुरु असताना सिद्धार्थला ही दुखापत झाली. त्याच्यावर त्वरित उपचारही करण्यात आले.
महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक अभिनेता म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला सध्या दुखापत झाली असून त्याला चार टाके पडले आहेत. मात्र उपचार करून शांत बसेल तर तो सिद्धार्थ कसला? उपचार झाल्यावर आराम न करता सरळ हातात बॅट पकडून पूर्वीच्याच एनर्जीने त्यानं सरावाला सुरुवातही केली. यातूनच तो अभिनयासोबतच क्रिकेटच्या बाबतीतही किती भावनाप्रवण आहे, हे दिसून येतं.