महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गुन्हेगारी जगाचा वेध घेणारा 'आयपीसी ३०७ ए', अभिनेता सचिन देशपांडे मुख्य भूमिकेत

'संघर्षयात्रा', 'शिव्या', असे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या साकार राऊत यांनी अर्थ स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून 'आयपीसी ३०७ ए' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

गुन्हेगारी जगाचा वेध घेणारा 'आयपीसी ३०७ ए', अभिनेता सचिन देशपांडे मुख्य भूमिकेत

By

Published : Nov 18, 2019, 5:56 PM IST

मुंबई -मराठी चित्रपटसृष्टीत माफिया जगाचा किंवा गुन्हेगारी जगाचा वेध घेणारे फारच थोडे चित्रपट आजवर झाले. त्यातही अगदीच काही चित्रपटांनी उल्लेखनीय यश मिळवलं. आता 'आयपीसी ३०७ ए' या चित्रपटातून माफिया जगाची आणि तरीही भावनिक कथा मांडण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'संघर्षयात्रा', 'शिव्या', असे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या साकार राऊत यांनी अर्थ स्टुडिओज या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून 'आयपीसी ३०७ ए' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वप्नील देशमुख यांनी दिग्दर्शन केलं आहे. तर, अभिनेता सचिन देशपांडे हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सचिन सोबत अन्य कलाकारही यात प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

गुन्हेगारी जगाचा वेध घेणारा 'आयपीसी ३०७ ए', अभिनेता सचिन देशपांडे मुख्य भूमिकेत

हेही वाचा -'दोन स्पेशल' कार्यक्रमात प्रशांत दामले - कविता लाड उलगडणार रंगतदार किस्से

'संघर्षयात्रा' आणि 'शिव्या' या चित्रपटांतून साकार राऊत यांनी दिग्दर्शक म्हणून लक्षणीय कामगिरी केली होती. आता निर्माता म्हणून त्यांनी निवडलेला विषय आणि संहिता चित्रपटाच्या रुपात पडद्यावर येत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हेही वाचा -'ह.म. बने तु.म. बने' मालिकेतून पहिल्यांदाच झळकणार तृतीयपंथी कलावंत

ABOUT THE AUTHOR

...view details