पुणे -अभिनेता मंदार कुलकर्णीने फोटोशूटदरम्यान अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी डेक्कन पोलीसांनी त्याला अटक केली आहे. पीडित मुलीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मंदारला अटक करण्यात आली.
फोटोशूटदरम्यान विनयभंग केल्याप्रकरणी अभिनेता मंदार कुलकर्णीला अटक - शेजारी शेजारी पक्के शेजारी
एका वर्कशॉपदरम्यान पीडित मुलगी आणि मंदार कुलकर्णी याची भेट झाली होती. या मुलीला अभिनय करण्यात रस असल्यामुळे मंदारने तिला एका नाटकाच्या ऑडिशनसाठी फोटोशूट करण्यास सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वर्कशॉपदरम्यान पीडित मुलगी आणि मंदार कुलकर्णी याची भेट झाली होती. या मुलीला अभिनय करण्यात रस असल्यामुळे मंदारने तिला एका नाटकाच्या ऑडिशनसाठी फोटोशूट करण्यास सांगितले. तसेच फोटो काढण्यासाठी तिला प्रभात रस्त्यावरील एका बंगल्यात घेऊन गेला.
त्यानंतर त्याने मुलीची इच्छा नसतानाही बिकिनीवर फोटोशूट केले..यानंतर हा प्रकार कुणाला सांगू नकोस असे म्हणून तिला धमकावले. अखेर हा मुलीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्याला अटक करून चार दिवस पोलीस कोठडीत ठेवले होते.
कोण आहे मंदार कुलकर्णी -
'शेजारी शेजारी पक्के शेजारी' या मालिकेत आणि 'लग्नबंबाळ' या व्यावसायिक नाटकातून मंदार कुलकर्णी नावारुपास आला होता.