वॉशिंग्टन - अमेरिकन अभिनेत्री लॉरा बेल बंडी हिची कोरोना व्हायरसटेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. ३८ वर्षिय लॉराने या बातमीला व्हिडिओ शेअर करीत दुजोरा दिलाय. व्हडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, 'मला कोरोना व्हायरस आहे.'
ती व्हिडिओत म्हणते, ''हॅलो, मी कोविड १९ टेस्ट केली ती पॉझिटीव्ह आली आहे हे मला तुम्हाला सांगायचे आहे. तर मला कोरोना व्हायरस आहे. घाबरण्याची गरज नाही. मी ठिक आहे. मी सर्व काळजी घेत आहे. डॉक्टरांनी सुचवलेल्या सर्व हेल्थ एक्सपर्टशी मी बोलत आहे. मी काही काळापासून जडी बुटीयाही खात आहे.''
यानंतर आपला अनुभव सांगताना ती म्हणते, ''लक्षणं खूप सामान्य होती. हे मागील काही आठवड्यापासून सुरू होते. डोकेदुखी, घसा बसणे, छातीत दुखणे आणि श्वास घ्यायला त्रास होत होता.''