मुंबई - अभिनेता हृतिक रोशन आपल्या मुलांसह भाड्याच्या घरात राहायला गेला आहे. जुहू येथील ज्या घरात तो सध्या भाड्याने राहतोय, त्याचा भाडे करार नुकताच झाला आहे. या करारानुसार ह्रतिक महिन्याला किती भाडे भरतो हे ऐकल्यास सर्वसामान्यांना भोवळ येईल. जुहू येथील भाड्याच्या घरासाठी ह्रतिक चक्क 8 लाख 25 हजार रुपये महिना भाडे भरत आहे. त्याने हे घर 5 वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे.
अभिनेता ह्रतिक रोशन भाड्याच्या घरात! भाडे ऐकून येईल भोवळ - हृतिक रोशन भाड्याच्या घरात
हृतिक रोशन नुकताच भाड्याच्या घरात राहायला गेला आहे. जुहूच्या गांधी ग्राम रोडवरील प्राईम बीचमध्ये हृतिकने हे घर भाड्याने घेतले आहे. या घराचे भाडे महिन्याला ८ लाख २५ हजार रुपये आहे.
जुहू येथील गांधी ग्राम रोडवरील प्राईम बीच बिल्डिंगमध्ये त्याने 3928 चौरस फुटाचे घर एप्रिलमध्ये भाड्याने घेतले आहे. या घराचा भाडेकरार 18 जूनला झाला आहे. त्यानुसार 60 महिन्यांसाठी म्हणजेच पाच वर्षांसाठी त्याने हे घर भाड्याने घेतले आहे. यासाठी तो पहिली तीन वर्षे 8 लाख 25 हजार रुपये भाडे देणार आहे, तर शेवटच्या दोन वर्षांसाठी 9 लाख रुपये महिना भाडे असणार आहे.
ह्रतिकने जेथे हे भाड्याने घर घेतले आहे. त्याच बिल्डिंगमध्ये अभिनेता अक्षय कुमारही राहतो, तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे घर उद्योगपती कोचर कुटुंबाचे आहे. याच कुटुंबाने नुकतेच लोअर परळ येथे 136 कोटींचे घर खरेदी केले आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ही प्राईम बीच बिल्डिंग ज्याठिकाणी उभी आहे, तिथे आधी असलेल्या घराचे मालक महात्मा गांधी यांच्या स्नेही होते. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर महात्मा गांधी या घरी यायचे. त्यामुळेच या परिसराला गांधी ग्राम रोड नाव पडल्याचे सांगितले जात आहे.