महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Dhanush Aishwaryaa Rajinikanth Separated : 'थलाईवा’ रजनीकांतचा जावई धनुष आणि ऐश्वर्याचा घटस्फोट - धनुष घटस्फोट मराठी बातमी

अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्याने घटस्फोट घेतला ( Dhanush Aishwaryaa Rajinikanth Separated ) आहे. 18 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.

Dhanush Aishwaryaa Rajinikanth Separated
Dhanush Aishwaryaa Rajinikanth Separated

By

Published : Jan 18, 2022, 2:56 AM IST

हैदराबाद -साऊथचा अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांचा घटस्फोट झाला ( Dhanush Aishwaryaa Rajinikanth Separated ) आहे. सोशल मीडियात पोस्ट करुन धनुषने ही माहिती दिली आहे. 18 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर त्या दोघांनी एकमेकांच्या संमतीने एकमेकांना घटस्फोट दिला आहे. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ( Aishwaryaa Actor Rajiniknath Daughter ) आहे.

धनुष आणि ऐश्वर्याने ट्वीट करत ( Dhanush And Aishwaryaa Tweet Separation ) म्हटलं की, "१८ वर्षांचा मित्रत्वाचा सहवास, नवरा बायको आणि पालक असणारे आम्ही नेहमीच एकमेकांचे वेल-विशर्स होतो. आमच्या सहजीवनाच्या प्रवासात आम्ही एकत्र मोठे झालो, एकमेकांना समजून घेत आणि एकमेकांना सांभाळून घेत. या प्रवासात आता आम्ही अशा वळणावर पोहोचलो आहोत की आम्ही दोघे आता निरनिराळ्या मार्गांवरून प्रवास करणार आहोत. ऐश्वर्या आणि मी यांनी वेगळे होण्याचे ठरविले असून आमच्यातील स्वत्व शोधण्याला प्राधान्य देऊ. कृपा आमच्या भावनांचा आदर करा आणि आमच्या गोपनीयतेचा भंग होईल असे काही करू नका. प्रेमाचा प्रसार करा.”

18 वर्षानी झाले विभक्त

काढण कोंडाईन या चित्रपटाच्या सेटवर धनुष आणि ऐश्वर्याची भेट झाली होती. सहा महिने डेट केल्यानंतर 18 नोव्हेंबर २००४ रोजी ते विवाहबद्ध होते. १८ वर्षे एकत्र घालवल्यावर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय ( Dhanush Aishwaryaa Rajinikanth Separated ) घेतला आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details