मुंबई -अभिनेता अतुल कुलकर्णी आणि त्याची पत्नी गीतांजली कुलकर्णी यांनी गोरेगावमधील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. हा एक दिवसच नाही, तर प्रत्येक दिवशी आपण मतदान केलेला उमेदवार नक्की काय काम करतो यावर सर्वसामान्य व्यक्तीने सजग रहायला हवं, असं मत अतुलने व्यक्त केलं आहे.
अतुलची पत्नी गीतांजलीने हिनेही यावेळी आपलं मत व्यक्त केलं. प्रत्येक पक्ष नक्की काय भूमिका घेतो आणि दिलेली आश्वासन किती पाळतो, याचा सर्वांगीण विचार करून मतदान करावं, असं ती यावेळी म्हणाली.
अभिनेता अतुल कुलकर्णीने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क हेही वाचा -राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात
यंदा प्रथमच कुणाला मतदान करायचं याबाबत आपलं आणि अतुलच एकमत झाले असल्याचं गुपित सुद्धा तिने सांगितलं आहे.
हेही वाचा -विधानसभा निवडणूक : नागपुरात मतदानाला सुरुवात, मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता राजेश श्रुंगारपुरेने बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता राजेश श्रुंगारपुरे याने आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना राज्य सरकारच्या ५ वर्षाच्या कामगिरीवर आपण समाधानी असल्याचं त्याने सांगितलं.