महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अपारशक्ती खुरानाचं पहिलं वहिलं गाणं 'या' दिवशी होणार प्रदर्शित - kudiye ni

अपारशक्ती खुरानाने आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. 'स्त्री' चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

अपारशक्ती खुरानाचं पहिलं वहिलं गाणं 'या' दिवशी होणार प्रदर्शित

By

Published : May 28, 2019, 1:16 PM IST

मुंबई -अभिनेता आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुरानाने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर आता तो गायनाकडेही वळला आहे. त्याचं पहिलं वहिलं पंजाबी गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कुडी नी' असे शिर्षक असलेलं हे गाणं अपारशक्तीनेच लिहिले आहे.

अपारशक्ती खुरानाने आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. 'स्त्री' चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. अलिकडेच तो कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनच्या 'लूकाछुपी' चित्रपटातही सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयामुळे त्याच्या फॅन फोलोविंगमध्येही वाढ झाली आहे.

अभिनयक्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर अपारशक्तीने त्याचे पहिले पंजाबी गाणे लिहिले आहे. हे गाणे त्याच्यासोबत नीती मोहनने गायले आहे. विशेष म्हणजे अपारशक्तीनेच हे गाणे कंपोज केले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन ताहिरा कश्यप-खुरानाने केले आहे. या गाण्यात अपारशक्तीसोबत सरगुन मेहता ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ३१ मे रोजी हे गाणे टी-सीरिज अंतर्गत लॉन्च करण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details