महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आता अभिनय बेर्डे सुद्धा करणार ‘दिशाभूल'! - Abhinay Berde starring in Dishabhul film

हँडसम अभिनेता अभिनय बेर्डे आता ‘दिशाभूल’ करताना दिसणार आहे, म्हणजे तो ‘दिशाभूल’ चित्रपटाचा भाग बनलाय. अभिनय सध्या गोव्यात 'दिशाभूल' चे चित्रीकरण करतोय.

अभिनय बेर्डे
अभिनय बेर्डे

By

Published : Feb 9, 2022, 8:00 PM IST

दिग्दर्शक आशिष कैलास जैन यांचा आगामी युथफुल चित्रपट 'दिशाभूल' चित्रपटात एव्हाना तेजस बर्वे, अमृता धोंगडे आणि माधुरी पवार यांची वर्णी लागली होती. आता या चित्रपटासाठी अजून एका चौथ्या कलाकाराची निवड झाली आहे. हँडसम अभिनेता अभिनय बेर्डे आता ‘दिशाभूल’ करताना दिसणार आहे, म्हणजे तो ‘दिशाभूल’ चित्रपटाचा भाग बनलाय. अभिनय सध्या गोव्यात 'दिशाभूल' चे चित्रीकरण करतोय.

अभिनय बेर्डे

सानवी प्रॉडक्शन हाऊसची पहिली निर्मिती असलेल्या ‘दिशाभूल’ या चित्रपटाची निर्मिती आरती चव्हाण यांची असून दिग्दर्शन आशिष कैलास जैन करत आहेत. यात अभिनेता तेजस बर्वे, अभिनेत्री अमृता धोंगडे, सोशल मीडिया स्टार माधुरी पवार यांच्या बरोबर 'दिशाभूल' मध्ये असलेला चौथा अभिनेता महाराष्ट्राचा लाडका युवा अभिनेता अभिनय बेर्डे हा आहे. 'दिशाभूल' या मल्टीस्टारर मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत तो दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अभिनय सध्या गोव्यात 'दिशाभूल' चे चित्रीकरण करतोय

आपल्या भूमिकेबद्दल सांगताना अभिनेता अभिनय बेर्डे म्हणाला, “'दिशाभूल' हा एक वेगळ्या धाटणीची कथा असलेलला चित्रपट आहे. यातील माझी व्यक्तीरेखा ही मी आजपर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी आहे. चित्रपटाचे शूटिंग आम्ही सध्या गोव्यात करत आहोत. याशिवाय पुणे आणि कोकणातही शूटिंग आहे, 'दिशाभूल' टीम बरोबर काम करणे एन्जॉय करतोय. कॉलेज विश्वातील मुलांभोवती फिरणाऱ्या 'दिशाभूल' मध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.”

अभिनय सध्या गोव्यात 'दिशाभूल' चे चित्रीकरण करतोय

‘दिशाभूल’ या चित्रपटात अभिनय बेर्डे बरोबर ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता तेजस बर्वे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. तसेच 'देवमाणूस' फेम अभिनेत्री, प्रसिद्ध नृत्यांगना माधुरी पवार प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेते नागेश भोसले, अभिनेत्री प्रिया बेर्डे, अभिनेता प्रणव रावराणे, शुभम मांढरे, रुही तारू, अरुण कदम, सिद्धेश्वर झाडबुके, आशुतोष वाडेकर, शरद जाधव, मंदार कुलकर्णी, गौतमी देवस्थळी अशी तगडी स्टारकास्ट आहे. 'दिशाभूल' चे डीओपी वीरधवल पाटील आहेत तर चित्रपटाला क्रिस मस्करेन्हस, प्रथमेश धोंगडे यांचे संगीत व गीते हरिभाऊ धोंगडे यांची आहेत. नृत्य दिग्दर्शन नील राठोड, कला दिग्दर्शन वैभव शिरोळकर, वेशभूषा शीतल माहेश्वरी, मेकअप राजश्री गोखले, संकलन विनोद राजे, ध्वनी निलेश बुट्टे यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

हेही वाचा -Oscar 2022 : जाणून घ्या, काय आहे ऑस्करसाठी नामांकित भारतीय चित्रपट 'रायटिंग विथ फायर'?

ABOUT THE AUTHOR

...view details