महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

Abhishek Bachchan on KRK : अभिषेक बच्चन केआरकेमध्ये रंगली तू तू मैं मैं - अभिषेक बच्चन कमाल खान वाद

अभिषेक बच्चनने 'वाशी' चित्रपटाचे पोस्टर शेयर केले आणि ट्विट केले. त्यावरून आता अभिषेक बच्चन आणि कमाल आर खान यांच्यात ट्विटरवॉर ( Abhishek Bachchan on KRK ) रंगले आहे.

abhishek kamaal r khan
abhishek kamaal r khan

By

Published : Feb 20, 2022, 2:45 PM IST

हैदराबाद : आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिध्द असलेल्या अभिनेता कमाल आर खान यांनी थेट अभिषेक बच्चनवर ( Abhishek Bachchan on KRK ) निशाणा साधला आहे. केआरकेच्या टीकांवर अभिषेकही गप्प बसला नाही. अभिषेकने त्याला कमाल आर खानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. हा सर्व वाद अभिषेक बच्चनच्या ट्विटने सुरू झाला असून, त्यात त्याने एका साऊथ चित्रपटाचे कौतुक केले आहे.

अभिषेक बच्चनचे ट्विट

अभिषेक बच्चनने आपल्या ट्विटमध्ये साऊथ चित्रपट 'वाशी'चे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, 'मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमधून वाशी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गुडलक टोविनो थॉमस, कीर्ती सुरेश आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा. जेव्हा अभिषेकचे हे ट्विट कमाल आर खानने पाहिले. तेव्हा नजरेस पडले तेव्हा त्याने आपल्या हास्यास्पद शैलीत अभिषेकचे ट्विट केले.

कमाल आर खानचे रीट्वीट

कमाल आर खानने अभिषेकचे ट्विट रिट्विट केले आणि ' कधी कधी तुम्ही बॉलीवूडचे लोकही अविश्वसनीय चित्रपट बनवतात.' असे लिहीले आणि त्याने लगेचच अभिनेत्याला चोख प्रत्युत्तर दिले. कमाल आर खानच्या या रिट्विटला उत्तर देताना अभिषेकने लिहिले, 'मी प्रयत्न करेन, तुम्ही देशद्रोही नाही केले होते.

अभिषेक बच्चन ट्विट

केआरकेचे मजेशीर ट्विट

अभिषेकचे उत्तर वाचून केआरकेने लिहिले, 'हाहाहा, तुझ्या मेकअपमनचे बजेट माझ्या चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त आहे. दुसरे म्हणजे, तुम्ही बॉलीवूडवाल्यांनी ते होऊ दिले नाही. अन्यथा, ब्लॉकबस्टर बनवून दाखवले असते.

हेही वाचा -Kangana on Gangubai Kathiawadi: या शुक्रवारी 200 कोटी रुपये होतील जळून खाक

ABOUT THE AUTHOR

...view details