महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अभिनय आणि हेमलची पडद्यामागेही सुरू आहे ‘अशी ही आशिकी’

अभिनय आणि हेमलच्या बाबतीत मात्र ही केमिस्ट्री जरा जास्तच बहरलेली दिसत आहे. ‘अशी ही आशिकी’ या सिनेमात ऑनस्क्रीन दिसणारी केमिस्ट्री आता ऑफस्क्रीनही पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे.

अभिनय आणि हेमल

By

Published : Feb 20, 2019, 10:59 AM IST

मुंबई- सचिन पिळगावकर दिग्दर्शित 'अशी ही आशिकी' हा सिनेमा १ मार्चला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एक फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय आणि नवोदित अभिनेत्री हेमल इंगळे हे या चित्रपटात पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

आता रोमॅन्टिक सिनेमा करायचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाची असते ती एकमेकांसोबतची केमिस्ट्री. अभिनय आणि हेमलच्या बाबतीत मात्र ही केमिस्ट्री जरा जास्तच बहरलेली दिसत आहे. ‘अशी ही आशिकी’ या सिनेमात ऑनस्क्रीन दिसणारी केमिस्ट्री आता ऑफस्क्रीनही पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर या सिनेमात स्वयम आणि अमरजा बनून एकमेकांना डेट करणारे अभिनय आणि हेमल रिअल लाईफमध्येही एकमेकांना डेट करत असल्याचं दिसत आहे.

प्रमोशनदरम्यान अभिनय आणि हेमलमध्ये झालेल्या जवळीकीमुळे आणि त्यांचे काही फोटो व्हायरल झाल्यामुळे ते एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. पडद्यावरील त्यांची केमिस्ट्री आणि त्यांची आशिकी पाहिल्यावर प्रत्येकजण म्हणेल की वेड्यासारखं आणि मनापासून प्रेम करणारी ‘अशी ही आशिकी’. खऱ्या आयुष्यात खरंच ते दोघं एकमेकांसोबत आशिकी करण्याच्या बेतात आहेत, की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र सुंदर आशिकी अनुभवयाची असेल तर १ मार्चला स्वयम आणि अमरजाची ‘अशी ही आशिकी’ सिनेमागृहात नक्की पाहा.

ABOUT THE AUTHOR

...view details