मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा २०१८ वर्षातील सुपरहिट ठरलेला 'अंधाधून' चित्रपट चीनमध्ये प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले होते. अल्पबजेट असलेल्या या चित्रपटाने १०० कोटी क्लबमध्येही एन्ट्री केली होती. आता हा चित्रपट चीनमध्ये 'पियानो प्लेअर' या नावाने प्रदर्शित होणार आहे.
आयुष्मानचा 'अंधाधून' चीनमध्ये 'पियानो प्लेअर' म्हणून होणार प्रदर्शित - आयुष्मान खुराना
चीनमध्ये आजवर अनेक भारतीय चित्रपटांना पसंती मिळाताना दिसते. 'बजरंगी भाईजान', 'हिचकी', 'हिंदी मिडीयम', यांसारख्या चित्रपटांनी चीनी बॉक्स ऑफिसही गाजवले. त्यामुळे आता 'अंधाधून' हा चित्रपट देखील चीनमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

'अंधाधून'चे चीनी पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहेत. 'व्हायाकॉम १८ मुव्हिज' यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे पोस्टर शेअर करण्यात आले आहेत. चीनमध्ये प्रदर्शित होणारा आयुष्मानचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटासोबतच श्रीदेवी यांचा शेवटचा 'मॉम' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन्हीही चित्रपटांना चीनी प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.