मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने आयुष्मान खुरानासोबत 'दम लगा के हैशा' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यांच्या जोडीला चाहत्यांचीही भरभरुन पसंती मिळाली. 'शुभ मंगल सावधान' चित्रपटातही दोघे झळकले होते. आता पुन्हा एकदा दोघेही पडद्यावर एकत्र येणार आहेत. दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या चित्रपटात दोघांची मुख्य भूमिका असणार आहे.
आयुष्मान-भूमीची तिसऱ्यांदा जमणार जोडी, 'या' चित्रपटात साकारणार भूमिका - shubh mangal savdhan
भूमी पेडणेकर हिने आयुष्मान खुरानासोबत 'दम लगा के हैशा' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. त्यांच्या जोडीला चाहत्यांचीही भरभरुन पसंती मिळाली. 'शुभ मंगल सावधान' चित्रपटातही दोघे झळकले होते.
अमर कौशिक यांनी 'स्त्री' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता ते 'बाला' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटामध्ये भूमी आणि आयुष्मानची जोडी दिसणार आहे.
दोघेही एकमेकांसोबत पुन्हा एकदा भूमिका साकारण्यासाठी उत्साही आहेत. या चित्रपटापूर्वी दोघांचेही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. भूमी 'सांड की आँख' या चित्रपटात शार्प शूटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर आयुष्मान देखील 'आर्टीकल १५' या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका साकारणार आहे.
आता दोघांच्याही 'बाला' चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.