महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग', 'शहीद भाई कोतवाल'चा ट्रेलर प्रदर्शित - shaheed bhai kotwal release date

'एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग' असं म्हणत ब्रिटिशांविरोधात निधड्या छातीनं लढणाऱ्या "शहीद भाई कोतवाल" यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.

Aashutosh patki starer Shaheed Bhai Kotwal trailer release
'एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग', 'शहीद भाई कोतवाल'चा ट्रेलर प्रदर्शित

By

Published : Jan 9, 2020, 12:22 PM IST

मुंबई -आजपर्यंत स्वातंत्र्य संग्रामातील अनेक व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपट तयार झाले आहेत. असेच एक स्वातंत्र्यसेनानी भाई कोतवाल यांची शौर्यकथा असलेला 'शहीद भाई कोतवाल' हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

'एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग' असं म्हणत ब्रिटिशांविरोधात निधड्या छातीनं लढणाऱ्या "शहीद भाई कोतवाल" यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रपटात अभिनेता आशुतोष पत्की मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा -अश्विनी एकबोटे यांचा अखेरचा चित्रपट 'मिस यु मिस' त्यांनाच समर्पित

स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथा पटकथा संवाद आणि गीते एकनाथ देसले यांनी लिहिली आहेत. भाई कोतवाल यांच्यासह गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील या बाप लेकांच्या शौर्याची कथा ही यात पहायला मिळणार आहे.

शहीद भाई कोतवालचे पोस्टर

या चित्रपटात आशुतोष पत्की, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर, अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

हेही वाचा -'अग्निहोत्र 2' मध्ये होणार अभिनेत्री पल्लवी पाटीलची एन्ट्री

अशोक पत्की, रुपेश गोंधळी, भरत बडेकर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. तर, सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, ज्ञानेश्वर मेश्राम, ऐश्वर्या देसले यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड काण्यात आली आहेत. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे असून कला दिग्दर्शक म्हणून देवदास भंडारे यांनी काम पाहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details