महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'आशिकी' चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण, कपिल शर्मासोबत उलगडणार आठवणी - Aashiqui Film memories

राहुल रॉयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या कार्यक्रमातील काही क्षण पोस्ट केले आहेत. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत अनु अग्रवाल, दीपक तिजोरी हे देखील हजेरी लावणार आहेत.

Aashiqui Film clocks 30 years, Rahul roy and anu agrawal, Rahul roy in Kapil Sharma Show, Anu agrawal in Kapil Sharma Show, 'आशिकी' चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण, राहुल रॉय आणि अनु अग्रवाल, Aashiqui Film memories, The Kapil Sharma show upcoming Episode
'आशिकी' चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण, कपिल शर्मासोबत उलगडणार आठवणी

By

Published : Feb 4, 2020, 10:53 AM IST

मुंबई -एका रात्रीत ज्या चित्रपटाने दोन नवोदित कलाकारांना सुपरस्टार बनवले अशा 'आशिकी' चित्रपटाला ३० वर्ष पूर्ण झाले आहे. अभिनेता राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवाल यांची जोडी या चित्रपटामुळे सुपरहिट झाली होती. चित्रपटासोबतच यातील गाण्यांनीही प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला होता. ९० च्या दशकातील या चित्रपटाची आजही क्रेझ पाहिली जाते. त्यामुळे या चित्रपटाची टीम 'द कपिल शर्मा' या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. तसेच, या चित्रपटाबद्दलच्या काही आठवणींनाही यानिमित्ताने उजाळा मिळणार आहे.

राहुल रॉयने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये या कार्यक्रमातील काही क्षण पोस्ट केले आहेत. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत अनु अग्रवाल, दीपक तिजोरी हे देखील हजेरी लावणार आहेत.

राहुल रॉयची पोस्ट

हेही वाचा -'सूर्यवंशी'च्या सेटवर कॅटरिनाने केली साफसफाई, अक्षयने शेअर केला मजेदार व्हिडिओ

कपिल सोबत या चित्रपटाचा प्रवास कसा होता, गेल्या ३० वर्षामध्ये कसा बदल झाला, यासंदर्भात बऱ्याच गोष्टी उलगडताना पाहायला मिळणार आहेत. या वर्षांमध्ये दोघांच्या लुकमध्येही बराच बदल झाला आहे. 'आशिकी' चित्रपटानंतर राहुल रॉय आणि अनु अग्रवाल फारसे चमकले नाही. मात्र, दोघांनाही फक्त याच चित्रपटासाठी ओळखले जाते.

महेश भट्ट यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर, गुलशन कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता कपिल शर्माच्या शोमध्ये आगामी भागात राहुल आणि अनुची झलक पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा -'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मानच्या आवाजातलं गाणं

ABOUT THE AUTHOR

...view details