महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लोकसभेच्या रिंगणात उतरणार आसावरी जोशी ?

काँग्रेसने स्टार प्रचारकांची जमवाजमव सुरु केली आहे. अभिनेत्री आसावरी जोशी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्या म्हणाल्या.

By

Published : Feb 18, 2019, 6:08 PM IST


मुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आसावरी यांचे पक्षात स्वागत केले.

आसावरी जोशी

येत्या लोकसभा निवडणूकीच्या तयारीला काँग्रेस पक्षाने मुंबईत सुरुवात केली आहे. यासाठी स्टार प्रचारकांची गरज लक्षात घेऊन अनेक अभिनेते आणि अभिनेत्री काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही दिवसापूर्वी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर है' मधून घराघरात ओळख बनविलेली शिल्पा शिंदे हिने काँग्रेमसध्ये प्रवेश केला होता. अजूनही काही अभिनेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूतोवाच निरुपम यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर आसावरी जोशी यांच्या प्रवेशाकडे पाहिले जाते.
आसावरी जोशी या हिंदी मराठी टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय नाव आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक चित्र अभिनेत्री म्हणून नाव कमवले आहे.

आसावरी जोशी

आपल्याला लहानपाणापासूनच समाजसेवेची आवड होती. मात्र यासाठी वेळ देणे जमले नव्हते. मात्र आता कामातून थोडा ब्रेक घेत आवड जोपासणार असल्याचे आसावरी म्हणाल्या. लोकसभेचे निवडणूक लढवणार का असे विचारले असता जर पक्षश्रेष्ठींनी सांगितले तर जरुर लढवेन असे त्या म्हणाल्या. पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी सोपवतील ती प्रामाणिकपणे मेहनतीने पार पाडेन असे त्या यावेळी म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details