मुंबई- मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी आपली लाडकी नात आराध्या हिच्या वाढदिवसाला तिच्या फोटोंचा कोलाज शेअर केला आहे. आज आराध्याचा ९ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिचे नऊ फोटो असलेला कोलज बच्चन यांनी चाहत्यांसमोर ठेवला आहे. बच्चन यांच्या या पोस्टवर भरपूर प्रतिक्रिया मिळत आहेत.
नऊ वर्षाचे ९ फोटो
अमिताभ यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या पहिल्या वाढदिवसापासून ते ती स्टार किड म्हणून वावरु लागली तिथपर्यंतचे फोटो या कोलाजसाठी निवडले आहेत. आराध्याचे हे निरागस फोटो पाहताना सर्वांनाच कौतुक वाटत आहे.