मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आराध्याने दमदार भाषण दिले आहे. तिच्या भाषणाचा एक छोटा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांनीदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
एरवी नेहमीच ऐश्वर्याच्या हातात हात असलेल्या आराध्यावर नेटकऱ्यांचा निशाणा असतो. मात्र, तिचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्या आवाजाची आणि सादरीकरणाची प्रशंसा केली आहे. आपल्या भाषणामध्ये तिने महिला सबलीकरणाचा मुद्दा अधोरेखित करत, एक भाषण सादर केलं.
हेही वाचा -भांडणानंतर पहिल्यांदा एकत्र आले कपिल आणि सुनील, पाहा फोटो