मुंबई -ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या यांनी अलिकडेच 'कान्स फिल्म फेस्टीव्हल'मध्ये हजेरी लावली होती. ऐश-अभिषेकसोबत आराध्याच्याही निरागस लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले. ऐश्वर्या आणि अभिषेक नेहमी आपल्या लाडक्या लेकीचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, सोशल मीडियावर आराध्याच्या एका व्हिडिओने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
ऐश्वर्याच्या लेकीचा 'गली बॉय' डान्स सोशल मीडियावर व्हायरल - cannes film festival
'गली बॉय' चित्रपटातील 'मेरे गली मे' हे गाणं तर तुम्हाला आठवत असेलच. याच गाण्यावर आराध्या आणि तिच्या बालमित्र-मैत्रिणींनी धमाल डान्स केला आहे. 'समर फंक २०१९' या कार्यक्रमात तिने या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.
'गली बॉय' चित्रपटातील 'मेरे गली मे' हे गाणं तर तुम्हाला आठवत असेलच. याच गाण्यावर आराध्या आणि तिच्या बालमित्र-मैत्रिणींनी धमाल डान्स केला आहे. 'समर फंक २०१९' या कार्यक्रमात तिने या गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. तिच्या या डान्सचे बॉलिवूड कलाकारांसह चाहतेही कौतुक करत आहेत.
आराध्याचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आराध्याचा डान्स पाहण्यासाठी ऐश्वर्या आणि अभिषेकनेही हजेरी लावली होती. सोशल मीडियावर या व्हिडिओला लाखो व्हिव्ज मिळाले आहेत.