मुंबई- आमिर खानची मुलगी इरा खान नुपुर शिखरे या मराठमोळ्या तरुणासोबत डेटिंग करीत आहे. यापूर्वीही तिने त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले होते. नुपूर शिखरे हा जीम ट्रेनर आहे. शुक्रवारचा दिवस त्यांनी कसा एकत्र घालवला याचा फोटो शेअर केला आहे.
इराने तिच्या बॉयफ्रेंडसह तिच्या वर्कआउट सेशनचा एक फोटो पोस्ट केला. फिटनेस ट्रेनर म्हणून काम करणारा नुपूर शिखरेही फोटोत हेडस्टँड करत असताना बाजूला उभे असल्याचे दिसू शकते.
दरम्यान, इरा खानचे वडील आमिर खानची गेल्या महिन्यात कोविड -१९ ची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर तो घरी क्वारंटाईनमध्ये रहात आहे.