मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा खान सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. कॅमेरा आणि लोकांपासून दूर राहणारी इरा सोशल मीडियावर मात्र सक्रिय असते. नवनवे फोटो शेअर करुन फॉलोअर्सना खूश करीत असते. आता तिने आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर करीत सर्वांनाच चकित केले आहे.
आमिर खानची मुलगी इराने उलगडले डेटिंगचे रहस्य - Dating
आमिर खानची मुलगी इरा खानने कुणासोबत डेटिंग करीत आहे याचा खुलासा केला आहे. ती नेहमीच आपल्या मित्रासोबतचे फोटो शेअर करीत असते. मिशाल कृपलानी असे या मित्राचे नाव आहे.
![आमिर खानची मुलगी इराने उलगडले डेटिंगचे रहस्य](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3547500-thumbnail-3x2-mishaal.jpg)
इरा खान आणि मिशाल कृपलानी
इन्स्टाग्रामवर तिने 'आस्क मी अ क्वेश्चन' या फिचरचा उपयोग करीत जिज्ञासू चाहत्यांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय. इरा खानला एका चाहत्याने प्रश्न विचारला की तू कोणासोबत डेटिंग करीत आहेस ? याचे उत्तर तिने बिनधास्तपणे दिले आहे. तिने मिशाल कृपलानीसोबतचा आपला फोटो शेअर केला आणि मिशालला टॅगही केला.
मिशाल आणि इरा डेट करीत असल्याची चर्चा आहे. दोघांचे अनेक फोटो इराने शेअर केले आहेत. दोघांचे फोटो पाहता त्यांच्यातील मैत्री वाढत असल्याचे दिसते.