महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

राजमौलीसोबत काम करण्याची इच्छा पूर्ण झाली : आलिया भट्ट - Aalia Bhat

एस एस राजमौली यांच्यासोबत काम करण्याची आलिया भट्टची इच्छा पूर्ण झाली आहे...आगामी आरआरआर या चित्रपटातून ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री मारत आहे...बहुभाषेतील हा चित्रपट ३० जुलै २०१० ला रिलीज होईल...

राजमौली आणि आलिया भट्ट

By

Published : Mar 16, 2019, 4:10 PM IST


मुंबई - बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्यासोबत काम करण्याची इच्छा तमाम कलाकारांची आहे. याला अभिनेत्री आलिया भट्ट अपवाद कशी असेल. ती सध्या राजमौली यांच्या आगामी 'आरआरआर' या तेलुगु सिनेमात काम करीत आहे. राजमौलीसोबत काम करण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे तिने म्हटले आहे.

'फेमिना महाराष्ट्र अचीवर्स अवार्ड 2019' या कार्यक्रमात आलिया बोलत होती. त्यापूर्वी राजमौली यांनी 'आरआरआर' सिनेमात आलिया भट्ट, अजय देवगण यांच्यासह रामचरण आणि ज्यू. एनटीआर यांच्या भूमिका असल्याचे सांगितले होते.

आलिया म्हणाली, 'आरआरआर' चा भाग झाल्यामुळे मी आता त्याची तयारी करीत आहे. सिनेमाबद्दल अधिक सांगू शकत नाही कारण याबद्दल बोलायचे की नाही हे मला माहिती नाही. परंतु मनापासून माझी राजमौली सरांसोबत काम करण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण होतेय. त्यामुळे मला खूप कृतज्ञता वाटते.

ती पुढे म्हणाली, मी पहिल्यांदाच साऊथ इंडियन सिनेमात काम करीत आहे. त्यामुळे मी खूप उत्साही आहे.

'आरआरआर' हा चित्रपट दोन स्वतंत्रता सेनानींची काल्पनिक कथा आहे. हा चित्रपट तेलुगु, तामिळ, मल्याळमसह हिंदी भाषेत ३० जुलै २०१० ला प्रदर्शित होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details