मुंबई - चित्रपट निर्मात्या मीरा नायर सध्या त्यांच्या आगामी 'अ सुटेबल बॉय' या चित्रपटावर काम करत आहेत. मात्र, या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री सदाफ जफरला पोलिसांनी अटक केली आहे. तिला सोडवण्यासाठी मीरा नायर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मागणी केली आहे.
सध्या देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून आंदोलन सुरू आहेत. सदाफने देखील लखनऊ येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यामुळे पोलिसांनी तिला अटक केली आहे.
'अ सुटेबल बॉय'च्या अभिनेत्रीला अटक, मीरा नायरने केली सोडवण्याची मागणी - Mira Nair demands release of Sadaf Jafar
मीरा नायर सध्या त्यांच्या आगामी 'अ सुटेबल बॉय' या चित्रपटावर काम करत आहेत. मात्र, या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री सदाफ जफरला पोलिसांनी अटक केली आहे.
'अ सुटेबल बॉय'च्या अभिनेत्रीला अटक, मीरा नायरने केली सोडवण्याची मागणी
मीरा नायर यांनी याबाबत ट्विट करून तिला सोडवण्याची मागणी केली आहे. 'लखनऊ येथे शांतपणे सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे सदाफ जफर हिला पोलिसांनी अटक केली आहे. तिला मारहाणही करण्यात आली आहे. तिला लवकरात लवकर सोडण्यात यावे', असे मीरा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सदाफच्या भाचीने सांगितले आहे, की 'सदाफला लखनऊच्या कारागृहात हलवण्यात आले आहे. तिथे तिला पोलिसांच्या क्रुरतेला सामोरे जावे लागत आहे'.