महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'पहला वोट पहला प्यार', धमाल रॅपच्या माध्यमातून मुंबईच्या रॅपर्सचं मतदानासाठी आवाहन - voting awarenewss

सध्या तरुणाईमध्ये रॅप गाण्याची मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळते. चित्रपटांमध्येही आता रॅप गाण्यांचा समावेश वाढला आहे. रॅप गाण्यातील शब्दही अगदी सहज लक्षात राहतात. एखादा संदेश या रॅपमधुन दिला जातो.

'पहला वोट पहला प्यार', धमाल रॅपच्या माध्यमातून मुंबईच्या रॅपर्सचं मतदानासाठी आवाहन

By

Published : Oct 20, 2019, 2:01 PM IST

Updated : Oct 20, 2019, 2:07 PM IST

मुंबई -सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. प्रचारतोफा थंडावल्या असल्या, तरीही मतदानासाठी विविध स्तरातून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. मतदान जनजागृतीसाठी आता मुंबईतील एक रॅपर्स ग्रुपही पुढे सरसावला आहे. 'पहला प्यार पहला वोट' या धमाल रॅपच्या माध्यमातून या रॅपर्सनी मतदानाचं आवाहन केलं आहे.

सध्या तरुणाईमध्ये रॅप गाण्याची मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळते. चित्रपटांमध्येही आता रॅप गाण्यांचा समावेश वाढला आहे. रॅप गाण्यातील शब्दही अगदी सहज लक्षात राहतात. एखादा संदेश या रॅपमधुन दिला जातो. त्यामुळेच मतदान जनजागृतीसाठी रॅपचा फंडा वापरल्याचं या रॅपर्स ग्रुपच्या चैतन्य प्रभूने सांगितलं आहे.

हेही वाचा - गांधी @150 : बॉलिवूड कलाकारांनी सांगितले महात्मा गांधीचे विचार, पंतप्रधान मोदींची घेतली भेट

उद्या म्हणजेच २१ ऑक्टोंबरला विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. या मतदान कार्यात तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, म्हणून हे रॅप तयार करण्यात आलं आहे, असंही चैतन्य प्रभूने म्हटलं आहे. या रॅपर्स ग्रुपमध्ये ४ जणांचा समावेश आहे. मतदान जनजागृतीसाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिनही भाषेत हे रॅप तयार करण्यात आलं आहे.

हेही वाचा - फेमिना मिस इंडिया २०१८ ची विजेती अनुकृती वास म्हणाली... "वन नेशन वन अॅप' ईज बेस्ट"

Last Updated : Oct 20, 2019, 2:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details