महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ऑस्कर २०२१ : लॉस एंजल्स शहरात रंगतोय ९३व्या ऑस्कर पुरस्कारांचा वितरण सोहळा - ऑस्कर २०२१

लॉस एंजल्स शहरातील 'द डॉल्बी थिएटर'मध्ये ९३व्या ऑस्कर पुरस्कारांचा वितरण सोहळा सुरू आहे. कोरोना महामारी असतानाही अकादमीने प्रत्यक्ष सोहळ्याचे वितरण ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

Oscar Awards Ceremony news
ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा २०२१

By

Published : Apr 26, 2021, 7:25 AM IST

लॉस एंजल्स - चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च मानाचे समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांचे वितरण सुरू आहे. लॉस एंजल्स शहरातील 'द डॉल्बी थिएटर'मध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. २००१ पासून याच ठिकाणी ऑस्करचे वितरण केले जाते. 'मोशन पिक्चर्स आर्टस् अ‌ॅण्ड सायन्स'च्यावतीने हे पुरस्कार दिले जातात. कोरोना महामारी असतानाही अकादमीने प्रत्यक्ष सोहळ्याचे वितरण ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. अभिनेत्री प्रियंका चोप्रा-जोनास आणि निक जोनास या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.

१० नामांकनांसह 'मंक' हा चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे. याशिवाय द फादर, जुडास अ‌ॅन्ड द ब्लॅक मसिहा, मिनारी, नोमॅडलँड, साऊंड ऑफ मेटल, द ट्रायो ऑफ द शिकागो या चित्रपटांना प्रत्येकी सात नामांकने मिळालेली आहेत.

क्लोई जाओ यांना नोमॅडलँड चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. दिग्दर्शकानासाठी पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला दिग्दर्शक आहेत. एमराल्ड फेनेलला सर्वोत्कृष्ट स्क्रिनप्लेसाठी पुरस्कार मिळाला. 'द फादर' या चित्रपटासाठी क्रिस्तोफर हेम्पटन आणि फ्लोरीन झेलर यांना बेस्ट अडॅप्टेड स्क्रिनप्लेसाठी पुरस्कार मिळाला. 'जुडास अ‌ॅ़ड द ब्लॅक मसिहा' या चित्रपटासाठी डॅनियल कलुयाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

ABOUT THE AUTHOR

...view details