महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

९३ वे अकॅडमी अवॉर्ड : आलिया भट्ट, ह्रतिक रोशन आणि निता लुल्ला यांचा ८१९ आमंत्रितांमध्ये समावेश - hrihtik roshan latest news

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, हृतिक रोशन आणि निता लुल्ला यांचा ८१९ नवीन सदस्यांमध्ये सहभागी होण्यासाठी ९३ व्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यास आमंत्रीत करण्यात आले आहे. इतर प्रमुख भारतीय कलाकारांच्यामध्ये कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकांत, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्स निष्ठा जैन आणि अमित मधेशिया, व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर्स विशाल आनंद आणि संदीप कमल यांचा आमंत्रीतांच्यामध्ये समावेश आहे.

93rd Academy Awards
९३ वे अकॅडमी अवॉर्ड

By

Published : Jul 1, 2020, 2:10 PM IST

लॉस एंजेलिस: बॉलिवूड स्टार आलिया भट्ट, हृतिक रोशन आणि वेशभूषा डिझाईनर नीता लुल्ला यांना अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (एएमपीएएस) मध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रण मिळाले आहे. त्यांचा ८१९ आमंत्रीतांच्या यादीत समावेश करण्यात आलाय.

आलिया भट्टचा झोया अख्तर दिग्दर्शित 'गल्ली बॉय' हा चित्रपट २०१९ च्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्यासाठी भारतातर्फे अधिकृत पाठवण्यात आला होता. तथापि, हा चित्रपट अंतिम पाचमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरला होता.

कास्टिंग डायरेक्टर नंदिनी श्रीकांत, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्स निष्ठा जैन आणि अमित मधेशिया, व्हिज्युअल इफेक्ट सुपरवायझर्स विशाल आनंद आणि संदीप कमल यांच्या नावांचाही समावेश आंत्रीतांच्या यादीत आहे. सदस्य म्हणून 68 देशांतील कलाकारांना आमंत्रित केले गेले आहे. यामध्ये अकॅडमीने ४५ टक्के महिलांचा समावेश केला आहे.

हेही वाचा - आषाढी वारीनिमित्त संकर्षण कऱ्हाडे विचारतोय 'पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं हाय का..?'

ज्यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे त्यांना 25 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या मतदानात सहभागी होण्याचे अधिकार असतील.

"मोशन पिक्चर आर्ट्स आणि सायन्समधील या प्रख्यात सहप्रवाशांचे स्वागत करण्यासाठी अकॅडमी खूप आनंदित आहे. आम्ही नेहमीच आपल्या जागतिक चित्रपट समुदायाच्या समृद्ध विविधतेचे प्रतिबिंबित करणारी विलक्षण प्रतिभा स्वीकारली आहे ," असे अकादमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details