नवी दिल्ली - येथील विज्ञान भवन येथे ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे आज दिल्ली येथे वितरण करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विजेत्यांना या पुरस्कार देण्यात येत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वेगवेगळ्या भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटाना या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. मात्र, त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहु शकले नाही.
६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, वाचा विजेत्यांची यादी
महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते. मात्र, त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहु शकले नाही.
६६ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा, वाचा विजेत्यांची यादी
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे -
- सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म - हेलारो
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन -आदित्य धर - उरी - सर्जिकल स्ट्राईक
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - आयुष्मान खुराना (अंधाधुन), विकी कौशल (उरी - सर्जिकल स्ट्राईक)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता -स्वानंद किरकिरे (चुंबक)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - सुरेखा सिक्री (बधाई हो)
- सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजक चित्रपट -बधाई हो
- सर्वोत्कृष्ट चित्रपट -अंधाधुन
- सर्वोत्कृष्ट सामाजिक विषयावर आधारित चित्रपट - पॅडमॅन
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - बिंदु मालिनी (मायावी मनावे - नाथिचरामी)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिक - अरिजीत सिंग (बिंते दिल - पद्मावत)
- सर्वोत्कृष्ट पदार्पणीय दिग्दर्शक - नाळ ( सुधाकर रेड्डी)
- सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा
- सर्वोत्कृष्ट राजस्थानी चित्रपट - टर्टल
- सर्वोत्कृष्ट उर्दू चित्रपट -हमीद
- सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट - महान्ती
- सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट -बिलबुल कॅन सिंग
TAGGED:
66th National Film Awards