महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

६६ th National film Awards  ; 'अंधाधुन' ठरला सर्वोत्कृट चित्रपट, 'भोंगा'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार - Bhonga

६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणा झाली असून अंधाधुन' या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहहे. शिवाजी लोटन पाटील यांच्या भोंगा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अंधाधुन' चित्रपट ठरला सर्वोत्कृट

By

Published : Aug 9, 2019, 4:05 PM IST

Updated : Aug 9, 2019, 5:04 PM IST


नवी दिल्ली - ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या घोषणेला सुरुवात झाली असून अंधाधुन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. भोंगा हा मराठी चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.

दिल्लीच्या शास्त्री भवनमध्ये राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे. ज्यूरी सदस्यांनी पुरस्कारांची यादी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सपूर्त केली. गेल्या वर्षी हे पुरस्कार एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आले होते आणि ३ मेला पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. मात्र सार्वत्रीक निवडणूकीमुळे हे पुरस्कार पुढे ढकलण्यात आले होते. त्याची आता घोषणा झाली आहे.


राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे
* सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट - हेल्लारो
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार - आदित्य धर ( उरी )
* सर्वोत्कृष्ट तेलुगु अभिनेत्री - किर्ती सुरेश ( महंती )
* सर्वोत्कृष्ट अभिनेता - आयुष्यमान खुराणा ( अंधाधुन ) आणि विकी कौशल ( उरी )

नर्गीस दत्त पुरस्कार
* नर्गीस दत्त पुरसाकार ओंढाल्ला इराडल्ला या कन्नड चित्रपटाला मिळाला आहे.
* सर्वोत्कृष्ट मनोरंजनासाठी लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार बधाई हो या हिंदी चित्रपटाला मिळाला आहे.
* सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार पॅडमॅन या हिंदी चित्रपटाला मिळाला आहे.
* पर्यावरणासाठी जागृती केल्याबद्दलचा पुरस्कार पाणी या मराठी चित्रपटाला मिळाला आहे.

* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार स्वानंद किरकिरे यांना मराठी चित्रपट चुंबकसाठी मिळाला आहे.
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार सुरेखा सिक्री यांना बधाई हो साठी मिळाला आहे.
* सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायक पुरस्कार अरजित सिंग यासला पद्मावतमधील बिन्ते दिल गाण्यासाठी मिळाला आहे.
* सर्वोत्कृष्ट संवाद - बंगाली चित्रपट तारीख
* सर्वोत्कृष्ट अडॅप्टेड पटकथा - अंधाधुन
* सर्वोत्कृष्ट पटकथा ( ओरीजनल ) - ची ला सोव
* सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे, पी.व्ही. रोहित, साहिब सिंग, तल्हा अर्शद रेशी
* सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनिंग- उरी
* सर्वोत्कृष्ट संकलन- नतिचरामी (कन्नड )
* सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनिंग- कामरा संभवम (मल्याळम)
* सर्वोत्कृष्ट वेशभुषा- महंती (तेलुगू)
* सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टीस्ट पुरस्कार तेलुगु चित्रपट अवे ला मिळाला आहे.
* सर्वोत्कृष्ट म्यूझिक डिरेक्टर - संजय लीला भन्साळी ( पद्मावत )
* सर्वोत्कृष्ट लिरीक्स - गीतकार मन्सूरे ( कन्नड चित्रपट नथीचारामी. गाणे मायावी मानवे )
* सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - केजीएफ ( कन्नड )

*सर्वोत्कृष्ट अॅक्शन - केजीएफ

*सर्वोत्कृष्ट मनोरंजक आणि लोकप्रिय चित्रपट - बधाई हो

Last Updated : Aug 9, 2019, 5:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details