एक मुलगा सामान्य आवाजात वाचतोय ‘पावसाची रिपरिप चालू आहे’, मध्येच त्याला अडवत एक व्यक्ती ‘अरे सेकंड सेमिस्टर नां’, मुलगा 'येस सर', मग ती व्यक्ती ‘आवाज वाढवून बोल’, पुढे तो मुलगा एकदम खड्या आवाजात ‘पावसात गाड्या उडवून कुणाच्या कपड्यावर चिखलाची बेलबुट्टी करतो रे’ काय अचंबित झालात ना? हा मुलगा नक्की काय वाचतोय? आणि मध्येच सेमिस्टर, येस सर सारखे शब्द कसे आले? अशी प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणाऱ्या '६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती ‘पुणे टॉकिज प्रा. लि.’ यांची असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.
या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रविण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, संगीतकार नरेंद्र भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.