पणजी - यंदाचा ५० वा आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळा (इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल) गोव्यात रंगणार आहे. २० ते २८ नोव्हेंबर पर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
यंदा या सोहळ्यासाठी रशिया हा भारताशी संलग्नित देश असणार आहे. सिनेसृष्टीतील मानाचा पुरस्कार सोहळा मानला जाणारा आतंरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात यंदा विविध देशातील २०० चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तसेच २६ विविध भारतीय भाषेतील चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत.