महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

5 वर्षीय मुलीने कियारा बनून 'शेरशाह'च्या क्लायमॅक्सवर प्रेक्षकांना रडवले - कॅप्टन विक्रम बत्रा बायोपिक

1999 च्या कारगिल युद्धात शहीद झालेल्या परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावरील 'शेरशाह' या बायोपिकला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 'शेरशाह' चित्रपटातील गाणी, संवाद आणि दृश्यांवर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. इन्स्टाग्रामवर अनेक व्हिडिओ रिल्स पाहायला मिळत आहेत. एका मुलीने बनवलेला एक भावुक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आहे.

शेरशाहच्या क्लायमॅक्सवर प्रेक्षकांना रडवले
शेरशाहच्या क्लायमॅक्सवर प्रेक्षकांना रडवले

By

Published : Sep 1, 2021, 9:14 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी यांच्या भूमिका असलेल्या शेरशाह चित्रपटाने नेटिझन्स, मातब्बर व्यक्ती आणि सेलिब्रिटींनी चित्रपटाच्या गाण्यांवर आणि दृश्यांवर अनेक रील बनवून सोशल मीडियावर वादळ निर्माण केले आहे. इंस्टाग्रामवर रातान लामियान आणि रांझा या गाण्यांचे भरपूर रील बनले आहेत. एक बालकलाकाराने या चित्रपटातील एका इमोशनल सीनवर रील बनवले आहे.

मुंबईतील एक बाल कलाकाराने हा व्हिडिओ बनवलाय. कियारा अडवानीने चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्राची मंगेतर डिंपल चीमाची भूमिका साकारली आहे. शेरशाह चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर अंत्यसंस्कार होतानाचा एक प्रसंग आहे. यावेळी शेरशाहची मैत्रिण असलेली डिंपल स्मशानात पोहोचते. त्याच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना ती भावूक होऊन रडते. या सीनवर मुंबईतील 5 वर्षे वयाच्या मुलीने रील बनवले आहे.

यापूर्वी कियाराने रांझा गाण्यावरील तिच्या नावाची रील शेअर केली होती. यावेळी बालकलाकार असलेल्या 5 वर्षीय मुलीचे हे रील तिने शेअर केले आहे. या रीलमधील त्या छोट्या मुलीचा अभिनय, चेहऱ्यावरील भाव अतिशय भावुक आणि उठावदार आहेत. याचे कौतुक कियाराने केले आहेत.

हेही वाचा - Manike Mage Hithe: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी गायिका आहे तरी कोण?, नेटीझन्सना भुरळ, बिग बीही फॅन

ABOUT THE AUTHOR

...view details