महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘ड्रीम गर्ल'ची 2 वर्षे : स्क्रिप्ट ऐकून भ्रमनिरास झाला होता - नुसरत भरुचा - आयुष्मान खुराना ‘ड्रीम गर्ल'च्या भूमिकेत

बालाजी मोशन पिक्चर्सचा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'ड्रीम गर्ल' मध्ये चक्क आयुष्मान खुराना ‘ड्रीम गर्ल' भूमिकेत दिसला होता. या विनोदी चित्रपटाने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली. याबद्दल बोलताना अभिनेत्री नुसरत भरुचा म्हणाली, ''दिग्दर्शकाने मला स्क्रिप्ट ऐकविली आणि माझा पूर्णतः भ्रमनिरास झाला.''

‘ड्रीम गर्ल'ची 2 वर्षे
‘ड्रीम गर्ल'ची 2 वर्षे

By

Published : Sep 14, 2021, 6:06 PM IST

Updated : Sep 14, 2021, 8:49 PM IST

हेमा मालिनीला ‘ड्रीम गर्ल’ म्हटले जायचे आणि तिने त्याच नावाच्या चित्रपटांमध्येही ड्रीम गर्लची भूमिका साकारली होती. एकता कपूर, बालाजी मोशन पिक्चर्सचा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'ड्रीम गर्ल' मध्ये चक्क आयुष्मान खुराना ‘ड्रीम गर्ल' भूमिकेत दिसला होता. या विनोदी चित्रपटाने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली. “मला जेव्हा हा चित्रपट ऑफर झाला तेव्हा मी अत्यंत खूष झाले होते. हेमा मालिनी प्रमाणे ‘ड्रीम गर्ल’ चा रोल साकारायला मिळणार म्हणून मी आनंदित झाले होते. दिग्दर्शकाने मला स्क्रिप्ट ऐकविली आणि माझा पूर्णतः भ्रमनिरास झाला. कारण या चित्रपटात ‘ड्रीम गर्ल’ ची भूमिका आयुष्मान खुराना साकारतोय हे तेव्हा कळले होते. माझाही रोल चांगलाच होता आणि आयुष्मानने त्या भूमिकेला उत्तम रितीने निभावले हेही तितकंच खरं”, अभिनेत्री नुसरत भरुचाने हसत-हसत सांगितले होते.

आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा अभिनीत जबरदस्त हिट चित्रपट ‘ड्रीम गर्ल’ने नुकताच आपला दुसरा वाढदिवस साजरा केला. आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा अभिनीत हा चित्रपट बॉक्स-ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. बालाजी मोशन पिक्चर्सच्या अधिकृत हँडलवरून शेअर करण्यात आले की, ''तो काळ आठवतोय जेव्हा एका फोन कॉलसाठी संपूर्ण जग प्रतीक्षेत होते. 'ड्रीम गर्ल'ची 2 वर्षे साजरा करीत आहोत.''

निर्माती एकता कपूर नेहमीच ‘आउट ऑफ द बॉक्स’ चित्रपटांना पाठिंबा देत असते, त्यातीलच एक म्हणजे ‘ड्रीम गर्ल'. तिच्या बालाजीने नेहमीच दर्शकांना मनोरंजक कंटेंट पुरवला आहे. ‘ड्रीम गर्ल' या चित्रपटाचे यश आणि आयुष्मान खुरानाचा पाथ-ब्रेकिंग परफॉर्मन्स, याचे प्रचंड कौतुक झाले. आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा अभिनीत ‘ड्रीम गर्ल' या चित्रपटात त्याच्या केमिस्ट्रीची भरपूर चर्चा झाली होती आणि दोघांचेही चाहते या दोघांना पुन्हा एकत्र बघण्यासाठी उत्सुक आहेत.

हेही वाचा - "भारताची लेक म्हणवून घेताना लाज वाटतेय", अफेयरच्या चर्चेवर बबिता संतापली

Last Updated : Sep 14, 2021, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details