महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ऑस्करसाठी तमिळ 'कूजंगल', 'सरदार उधम', 'शेरनी'सह 14 सिनेमांचा नामांकनात समावेश - ऑस्करसाठी तमिळ 'कूजंगल',

विनोथराज दिग्दर्शित 'कूजंगल' तमिळ चित्रपटाला यावर्षीच्या सुरुवातीला रॉटरडॅमच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित टायगर पुरस्कार मिळाला होता. सनल कुमार ससिधरन यांच्या 'सेक्सी दुर्गा' (2017) नंतर 'कूजंगल' (Koozhangal) हा टायगर पुरस्कार जिंकणारा दुसरा भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटाचा समावेश भारताच्या वतीने ऑस्करसाठी नामांकित केलेल्या 15 चित्रपटांमध्ये करण्यात आला आहे.

विनोथराज दिग्दर्शित 'कूजंगल'
विनोथराज दिग्दर्शित 'कूजंगल'

By

Published : Oct 23, 2021, 8:32 PM IST

मुंबई- चित्रपटविश्वातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 94 व्या अकादमी पुरस्कारांनी (ऑस्कर अवॉर्ड्स) पुन्हा एकदा भरारी घेतली आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी देशातील आणि जगातील अनेक चित्रपट ऑस्करसाठी निवडले गेले आहेत. देशातील एकूण 14 चित्रपटांना ऑस्करमध्ये नामांकने मिळाली आहेत. त्यात विकी कौशलचा 'सरदार उधम' आणि विद्या बालनचा 'लायनेस' या चित्रपटाचाही समावेश आहे. त्यात आता तामिळ चित्रपट 'कूजंगल'चे (Koozhangal) नावही जोडले गेले आहे.

'कूजंगल' हा तमिळ दिग्दर्शक पीएस विनोथराज यांचा पदार्पणाचा चित्रपट आहे, जो ऑस्करसाठी जात आहे. 15 सदस्यीय निवड समितीचे अध्यक्ष शाजी एन करुण यांनी शनिवारी ही घोषणा केली. एफएफआयचे सरचिटणीस सुप्रान सेन म्हणाले की, हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

ऑस्कर पुरस्काराचे उद्घाटन 27 मार्च 2022 रोजी कॅलिफोर्नियाच्या डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे. विनोथराज दिग्दर्शित 'कुजंगल' चित्रपटाने या वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅममध्ये प्रतिष्ठित टायगर पुरस्कार जिंकला होता.

सनल कुमार शशिधरन यांच्या 'सेक्सी दुर्गा' (2017) नंतर 'कुजंगल' हा टायगर पुरस्कार जिंकणारा दुसरा भारतीय चित्रपट आहे. विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'सरदार उधम', विद्या बालनचा 'लायनेस', मल्याळम भाषेतील 'नयाट्टू' आणि तमिळ चित्रपट 'मंडेला' यासह 15 भारतीय चित्रपटांनी ऑस्करच्या शर्यतीत प्रवेश केला आहे.

हेही वाचा - ड्रग कनेक्शनबाबत आजवर 'इतक्या' बॉलिवूड अभिनेत्रींची एनसीबीने केलीय चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details