महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

१ अब्ज व्यूव्ह्ज : धनुषच्या 'कोलावरी डी'चा मोडला त्याच्याच 'राउडी बेबी'ने विक्रम - Record of the song Kolavari D by Dhanush

धनुष आणि सई पल्लवी यांच्या 'राउडी बेबी' गाण्याने यूट्यूबवर एक अब्ज व्यूव्ह्जची संख्या ओलांडली आहेत. हे पहिले दाक्षिणात्य गाणे आहे, ज्याला अब्जावधी व्ह्यूव्ह्ज मिळाले आहेत. धनुषच्या कोलावरी डी या गाण्याचा विक्रमही या गाण्याने मोडलाय.

Dhanush
धनुष आणि सई पल्लवी

By

Published : Nov 17, 2020, 5:05 PM IST

चेन्नई - दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि सई पल्लवी यांच्या 'राउडी बेबी' गाण्याने यूट्यूबवर एक अब्ज व्यूव्ह्जची संख्या ओलांडली आहेत. धनुष आणि सई पल्लवी यांचे 'राउडी बेबी' हे गाणे 'मारी 2' या चित्रपटातील आहे. या गाण्याचे संगीत युवाशंकर राजा यांनी दिले आहे, तर या गीताचे बोल धनुष यांनी लिहिले आहेत. या गाण्याला धनुष व्यतिरिक्त धी हिने आपला आवाजही दिला आहे.

हेही वाचा -''मी पुन्हा गाईन मी पुन्हा गाईन'' : महेश टिळेकरांची अमृता फडणवीसांच्या गायनावर जोरदार टीका

राउडी बेबीच्या यशाबद्दल प्रेक्षकांचे धनुषने ट्विट करून आभार मानले आहेत. ''हा एक सुखद संयोग आहे. राऊडी बेबीने एक अब्ज व्यूव्ह्ज मिळवले आहेत. तेही कोलावरी डीच्या नवव्या वर्धापनादिवशी. आमच्यासाठी ही सन्मानजनक गोष्ट आहे. हे पहिले दाक्षिणात्य गाणे आहे ज्याला अब्जावधी व्ह्यूव्ह्ज मिळाले आहेत. आमची टीम आपले मनापासून आभार मानतो.,'' असे धनुषने लिहिले आहे.

हेही वाचा -पाहा, काजल अग्रवालच्या हनीमूनचे पतीसोबत समुद्रातील रोमँटिक फोटो

राउडी बेबीच्या या खास यशाबद्दल सई पल्लवीने ट्विट करताना लिहिलंय की, 'राउडी बेबीवर प्रेम केल्याबद्दल धन्यवाद ... एक अब्ज प्रेम.... आणि मोजणी अजूनही सुरूच आहे.'

ABOUT THE AUTHOR

...view details