महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

जायरा वसीमवर ट्रोलर्सची अक्षरशः 'टोळ धाड', ओढवला ट्विटर बंद करण्याचा प्रसंग - जायरा वसीम ट्रोल

जायरा वसीम पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल होत आहे आणि यावेळी हा टोळ हल्ला आहे. या माजी अभिनेत्रीने देशातील अनेक भागात घडलेल्या टोळ हल्ल्याशी संबंधित ट्विट केले होते, ज्यामध्ये या सर्व घटनांना अल्लाहचा कहर असल्याचे ती म्हणाली होती. मात्र ट्रोल झाल्यानंतर तिने आपले ट्विटर अकाउंट बंद केले आहे.

Zaira Wasim
जायरा वसीम

By

Published : May 29, 2020, 8:10 PM IST

मुंबई - बॉलिवूडशी संबंध तोडणारी 'दंगल गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायरा वसीम अनेकदा कॉन्ट्राव्हर्सीने घेरली जाते. यावेळी तिच्याशी संबंधित कॉन्ट्राव्हर्सी देशातील अनेक भागात झालेल्या प्राणघातक टोळ हल्ल्याशी संबंधित आहे. या माजी अभिनेत्रीने तिच्या ट्विटर हँडलवरील टोळ हल्ल्याविषयी एक ट्विट केले होते, ज्यात तिने त्यामागचे कारण अल्लाहचा कहर असल्याचे म्हटले होते.

जायरा वसीम पुन्हा एकदा ट्विटरवर ट्रोल

जायराने ट्विटरवर कुराणचे एक पद्य लिहून हा हल्ला एक इशारा असल्याचे सांगत, हा अल्लाहचा कहर असल्याचे लिहिलंय. तिने लिहिलंय, 'आम्ही त्यांना पूर आणि फडशाळे, उवा, बेडूक आणि रक्त पाठविले. ही स्वतः ची निशाणी आहे. परंतु ते घमेंडीमध्ये मग्न होते, ज्यांनी पाप केले. कुरआन 7:133.'

जायरा वसीमच्या या ट्विटनंतर तिच्यावर चौफेर टीका सुरू झाली. ट्रोलरचा आक्रमकपणा पाहून तिने आपले ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे.

जायरा 'द स्काई इज पिंक' या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरसमवेत शेवटची झळकली होती. परंतु चित्रपट रिलीज होण्यापूर्वी धर्माचे पालन करण्यात अडचण असल्याचे सांगून त्यांनी चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानंतर, तिच्या प्रत्येक मताला ट्रोल केले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details