मुंबई - 'दंगल गर्ल' जायरा वसिमने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिनेजगतात खळबळ उडाली आहे. अनेक सेलेब्रिटींनी तिला पाठींबा देऊनदेखील जायरा आपल्या निर्णयावर ठाम राहिली. आता ती आगामी 'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही दिसणार नसल्याचे समजते.
'द स्काय इज पिंक' या शेवटच्या चित्रपटाच्या प्रमोशनमधूनही जायराने काढले अंग - Zaira backs out of her last film
दंगल गर्ल जायरा वसिम आगामी 'द स्काय इज पिंक' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभागी होणार नाही. ऑक्टोबरमध्ये रिलीज होत असलेल्या या चित्रपटाचे ऑगस्टमध्ये प्रमोशन सुरू होणार आहे. आपल्या अखेरच्या चिर्पटाच्या प्रमोशनलाही ती हजर राहणार नसल्याचे समजते.
'द स्काय इज पिंक' चित्रपटाचे प्रमोशन ऑगस्टमध्ये सुरू करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. ११ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. मात्र, जायराची इन्स्टाग्रामची पोस्ट पाहिली तर ती यात सहभागी होणार नसल्याचे संकेत आहेत. प्रमोशनसाठी तिने सहभागी व्हावे अशी निर्मात्यांची प्रमाणिक इच्छा आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शिक शोनाली बोस आणि टीमला तिचा निर्णय कळवण्यात आलाय आणि टीमने तिच्या निर्णयाला पाठींबा दर्शवलाय. प्रॉडक्शन हाऊसने आपला पाठींबा जायरला असल्याचे अगोदर प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले होते. २९ जूनला जायराने आपण बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा सोशल मीडियावरुन केला होता.