मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन अलीकडेच सोशल मीडियावर इंग्लिश ट्यूटोरियल देण्याच्या मन: स्थितीत असल्याचे दिसत आहे.
बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे : "आपणास इंग्रजी सोपे आहे असे वाटते का?? 1) The bandage was wound around the wound. 2) The farm was used to produce produce. 3) The dump was so full that it had to refusemore refuse. 4) We must polish the Polish furniture.. He could *lead* if he would get the *lead* out." यात त्यांनी इंग्रजी शब्दांचे एकाच वाक्यात कसे वेगवेगळे अर्थ लागू होतात, ते सोदाहरण दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
अमिताभ बच्चन यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यात ते स्टायलिश हुडीमध्ये ट्रॅक पँटमध्ये दिसत आहेत.
कोरोनाचा उपचार घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते मोकळ्या जागेत बच्चन वावरताना दिसले. त्यांची आई तेजी बच्चन यांच्या स्मरणार्थ त्यांनी अलिकडेच आपल्या बागेमध्ये गुलमोहराच्या झाडाचे रोपन केले. याचा एक फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
"१९७६ मध्ये प्रीतक्षा हे आमचं पहिलं घर मिळालं तेव्हा मी हे इथे 'गुलमोहराचे झाड लावले होते. नुकत्याच झालेल्या वादळाने ते खाली आले.. पण काल माझ्या आईच्या वाढदिवशी १२ ऑगस्ट रोजी मी त्याच जागेत नवीन गुलमोहर झाडाची पुनर्स्थापना केली.!" असे त्यांनी या फोटोसोबत लिहिले आहे.