मुंबई- गेल्या दोन दशकांत हिंदी, पंजाबी, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये अविरतपणे काम करणारी अभिनेत्री नेहा धुपिया म्हणाली की ती जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवखी होती तेव्हा एका कास्टिंग डिरेक्टरने तिला हसणं टाळण्याचा सल्ला दिला होता. ती हसताना चांगली दिसत नाही, असे तिचे म्हणणे होते.
नेहाच्या बॉलिवूड कारकिर्दीच्या अगोदर २००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकली होती. त्यापूर्वी नेहाने १९९४ मध्ये 'मिन्नाराम' या मल्याळम चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले होते.
नेहा धूपिया आता २वर्षाच्या मुलीची आई आहे, दोन दशकांहून अधिक काळ चित्रपट आणि करमणूक उद्योगात आहे आणि अलीकडेच 'स्टेप आऊट' नावाच्या शॉर्ट फिल्मची ती निर्माती बनली आहे. तथापि, अगदी सुरुवातीच्या काळात तिला टीकेला सामोरे जावे लागले होते.