'ये साली आशिकी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. कॉलेजमध्ये सुरू झालेली प्रेमकहाणी एका वेगळ्या तणावाच्या स्थितीत कशी पोहोचते याचे चित्रण यात पाहायला मिळते. अत्यंत धक्कादायक कथानक असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये खळबळ माजवणार हे ट्रेलर पाहून लक्षात येते. चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढवण्यात ट्रेलरला चांगले यश आल्याचे दिसते.
पाहा, धक्कादायक कथानक असलेला 'ये साली आशिकी'चा ट्रेलर - Shivaleeka Oberoi latest news
कॉलेजमध्ये सुरू झालेली प्रेमकहाणी एका वेगळ्या तणावाच्या स्थितीत कशी पोहोचते याचे चित्रण असलेला 'ये साली आशिकी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अत्यंत धक्कादायक कथानक असलेला हा चित्रपट थिएटरमध्ये खळबळ माजवणार, हे ट्रेलर पाहून लक्षात येते.

बऱ्याच दिवसापासून वर्धन पुरीच्या बॉलिवूड एन्ट्रीच्या चर्चा सुरू होत्या. बॉलिवूडचे दिग्गज खलनायक अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी हा त्याच्या पहिल्या वहिल्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. आता 'ये साली आशिकी', या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटामध्ये वर्धनसोबत शिवालिका ओबेरॉय ही नवोदित अभिनेत्री देखील झळकणार आहे.
राजीव अमरीश पुरी यांची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन चिराग रुपारेल हे करत आहेत. यावर्षी २२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.