हैदराबाद: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे २०२१ हे वर्ष बॉलिवूडसाठी काही खास राहिलेले नाही. मात्र, यावर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी काहींनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला, तर काहींनी प्रेक्षकांची निराशा केली. या वर्षी बहुतेक चित्रपट फक्त OTT वर प्रदर्शित झाले. वर्ष संपणार आहे, त्यामुळे आपण या वर्षातील हिट आणि फ्लॉप चित्रपटांबद्दल बोलू.
शेरशाह
या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'शेरशाह' या देशभक्तीपर चित्रपटाने प्रेक्षकांचे पैसे वसूल केले. विष्णू वर्धन दिग्दर्शित, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट 'कारगिल युद्ध' (1999) मध्ये शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या लढाईवर आधारित होता. या चित्रपटात सिद्धार्थने शहीद कॅप्टन विक्रम बत्राची तर कियाराने डिंपलची भूमिका साकारली होती.
सरदार उधम
शूजित सरकार दिग्दर्शित 'सरदार उधम' चित्रपटाने वर्षातील हिट चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले. विकी कौशलने या चित्रपटात कौतुकास्पद काम केले आहे. हा चित्रपट यावर्षी 16 ऑक्टोबर रोजी OTT वर प्रदर्शित झाला होता.
83
यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला 83 हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची ओपनिंग शानदार होती. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने 1983 क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली होती. तर दुसरीकडे दीपिका कपिल देव यांच्या पत्नी रुमीच्या भूमिकेत दिसत आहे.
सूर्यवंशी
यंदाचा 'सूर्यवंशी' बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'सूर्यवंशी' या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 190 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई