महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

फ्लॅश बॅक २०१९ : स्टार किड्सचा बॉलिवूडमध्ये जलवा

या वर्षात अनेक स्टार किड्स आणि नव्या चेहऱ्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अनेकांची भविष्य उज्वल असल्याचे यातून जाणवले. विशेषतः स्टार किड्सनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. बॉलिवूडमध्ये नेपोटिझम असल्याची टीका कितीही होत असली तर स्टार किड्सना पदार्पण करण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. यावर्षी आलेल्या नव कलाकारांचा हा थोडक्यात आढावा.

Star kids debut in bollywood
स्टार किड्सचा बॉलिवूडमध्ये जलवा

By

Published : Dec 26, 2019, 5:46 AM IST


२०१९ हे वर्ष बॉलिवूडसाठी उत्तम होते. यावर्षी अनेक स्टार किड्स यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यातील काही चित्रपट हिट झाले तर काहींना बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवण्याची संधी मिळाली नाही. मात्र या स्टार किड्सनी प्रेक्षकांची मने मात्र जिंकली आहेत. २०१९ मध्ये ज्या स्टार किड्सनी आपली छाप सोडली त्यांचा आढावा घेऊयात.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले कलाकार

२०१९ मध्ये सर्वात महत्त्वाचे नाव होते चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिचे. धर्मा प्रॉडक्शनच्या 'स्टुडन्ट ऑफ द इयर २' या सिनेमात अनन्याने टायगर श्रॉफ समवेत भूमिका साकारली होते. हा तिचा पहिला पदार्पणाचा सिनेमा होता. यात नाव कमावलेल्या अनन्याने कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरसोबत 'पती पत्नी और वोह' या सिनेमात उत्तम भूमिका साकारली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही उत्तम चालला.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले कलाकार

'स्टुडन्ट ऑफ द इयर' चित्रपटातू पदार्पण केलेल्या तारा सुतारियाने यावर्षी मिलाप जव्हेरी यांच्या 'मरजावां' चित्रपटात सिध्दार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्यासोबत झळकली. तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले कलाकार

याशिवाय सलमान खानच्या प्रॉडक्शनच्या वतीने बनलेल्या 'नोटबुक' चित्रपटातून पदार्पण केलेल्या जहीर इक्बाल या अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करु शकला नाही. जहीर इक्बालच्या अभिनयाचे कौतुक झाले.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले कलाकार

'नोटबुक' या चित्रपटातून आणखी एका अभिनेत्रीने पदार्पण केले. तिचे नाव आहे प्रनुतन बहल. दिग्गज अभिनेत्री नुतन यांची ती नात आणि मोहनिश बहलची मुलगी आहे. जहीर इक्बालसोबत तिची निरागस लव्ह केमेस्ट्री पाहाण्यासारखी होती. आपल्या सहज अभिनयाने प्रनुतनने बॉलिवूडचे लक्ष वेधले आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले कलाकार

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात दोन सर्वात खास कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. दिग्दर्शक, अभिनेता महेश मांजरेकरची मुलगी सई मांजरेकर हि सलमान खानसोबत दबंग ३ मध्ये भूमिका साकारुन आपले पदार्पण केले.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले कलाकार

दुसरा आहे मर्दानी २ चा खतरनाक खलनायक विशाल जेठवा. यात जसे रानीची जबरदस्त पुलिस अधिकाऱ्याची भूमिका लक्षात राहिली तसोच विशालने साकारलेला खलनायक प्रभावी होता. त्याच्या प्रभावी अभिनयाची अजूनही बॉलिवूड जगतात चर्चा आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले कलाकार

कॉमेडी किंग जावेद जाफरीच्या मुलानेही यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.जावेदचा मुलगा मिजान जाफरीने संजय लीला भन्साळी यांच्या 'मलाल' चित्रपटातून पदार्पण केले. बॉक्स ऑफिसवर 'मलाल' ने कमाल केली नसली तरी मिजानचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात राहिला.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले कलाकार

'मलाल' चित्रपटातून आणखी एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली. भन्साळींची भाची असलेल्या शार्मिन सेगल हिने या सिनेमातून पदार्पण केले. तिच्या अभिनयाचीही तारीफ झाली.

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले कलाकार

धर्मेंद्रचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओलने 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून पदार्पण केले. याचे दिग्दर्शन सनी देओलने केले होते. या सिनेमाच्या अॅक्शनची बरीच चर्चा झाली

बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले कलाकार

सनी देओल दिग्दर्शित 'पल पल दिल के पास' चित्रपटातूनच सहर बाम्बा या नव्या अभिनेत्रीने बॉलिवूड प्रवेश केला. या सिनेमातील तिचा अभिनय पाहता तिला आगामी काळात उत्तम भवितव्य अशू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details