मुंबई- 'सुरमा' चित्रपटातील उत्तम अभिनयानंतर अभिनेता आणि पंजाबी गायक दिलजीत दोसांझ लवकरच आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटात दिलजीतच्या अपोझिट अभिनेत्री यामी गौतम झळकणार असून या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
यामी-दिलजीत पहिल्यांदाच झळकणार एकत्र, 'या' चित्रपटात साकारणार भूमिका - surma
या चित्रपटातूनच दिग्दर्शक अझीझ मीर्झा यांचा मुलगा हारौन दिग्दर्शनीय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हारौनने याआधीही अझीझ मीर्झा यांच्या 'राजू बन गया जेंटलमन', 'यस बॉस' आणि 'पहेली'सारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

या चित्रपटातूनच दिग्दर्शक अझीझ मीर्झा यांचा मुलगा हारौन (HAROUN) दिग्दर्शनीय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हारौनने याआधीही अझीझ मीर्झा यांच्या 'राजू बन गया जेंटलमन', 'यस बॉस' आणि 'पहेली'सारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. अर्शद आणि विभा सिंग यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे तर रमेश तौरानी यांची निर्मिती असणार आहे.
येत्या ऑगस्ट महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप निश्चित झालं नाही. दरम्यान दिलजीत लवकरच 'गूड न्यूज' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर यामी 'बाला' या चित्रपटात आयुष्मान आणि भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.