महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एकता कपूरच्या अडचणीत पुन्हा वाढ; इंदौरमध्येही गुन्हा दाखल - एक्सएक्सएक्स अनसेन्सॉर 2 वेबसीरिज वाद

एकता कपूर तिच्या एक्सएक्सएक्स अनसेन्सॉर 2 ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई, हैदराबाद, गुरुग्राम नंतर आता इंदौरमध्येही तिच्या विरोधात तक्रार दाखल झालीय.

Ekta Kapoor
एकता कपूर

By

Published : Jun 6, 2020, 2:45 PM IST

इंदौर- एकता कपूरची नुकतीच प्रदर्शित झालेली एक्सएक्सएक्स अनसेन्सॉर 2 ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वेबसीरिजमध्ये सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी इंदौरच्या साकेतनगर येथील नीरज यागणिक या व्यक्तीने एकता कपूर यांच्या विरोधात अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

एक्सएक्सएक्स अनसेन्सॉर 2 या सीरिजमधील एका सीनमधून भारतीय लष्काराच्या सन्मानाला ठेच पोहोचत असून यात सैनिकांच्या गणवेशाचा अपमान केला गेला आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

एकता कपूर, जेसिका खुराणा आणि पंखुडी राड्रिक्स आणि इतरांवर कलम 294, 298, 34, आयटी कायदा, 67,68 आणि राष्ट्रीय प्रतीके कायदा कलम 3 नुसार गुन्हा नोंदवला आहे.

भाजप आमदार टी. राजा आणि यूट्यूबर हिंदूस्तानी भाऊ यांच्यापाठोपाठ आता हरिद्वार येथील संत आणि पुजाऱ्यांनीही या सीरिजवर आक्षेप नोंदवला आहे. या सीरिजमध्ये वादग्रस्त सीन दाखवल्याचा आरोप केला जात आहे.

गुरुग्राम येथील सेवानिवृत्त जवानाने पालम विहार पोलीस ठाण्यात एकता कपूर विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details